ताज्या घडामोडी

संपूर्ण जिल्ह्यात “स्वच्छ भारत अभियान” सप्ताह राबविण्यासाठी पंकज पोहरे यांचे जनतेला आवाहन.

अविनाश पोहरे / पातूर

पातूर शहरातील एकमेव सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, व कला क्षेत्रात अग्रेसर असलेली द प्रोफेशनल करिअर अकॅडमी बहूउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंकज पोहरे हे नेहमीच आपल्या कार्यातून ओळखले जातात. मागील वर्षी महात्मा गांधी जयंती निमित्त सामाजिक ज्वलंत विषयावर भव्य जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते यावर्षी सुद्धा जिल्ह्यातील सर्व विध्यार्थ्यांना कोरोना असल्यामुळे सोशल डिस्टन्स ठेऊन आपल्या गावात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात यावे असे आवाहन द प्रोफेशनल करिअर अकॅडमी चे संस्थाध्यक्ष पंकज पोहरे यांनी विध्यार्थ्यांना तथा सर्व जनतेला केले.महात्मा गांधी यांनी स्वच्छतेचा संदेश दिला असून तो यशस्वी करण्यासाठी आज सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. आजची परिस्थिती लक्षात घेता गावागावात गलिच्छ वस्ती, घाणीचे साम्राज्य, रस्त्यावर असलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आज सर्व नागरिकांनी, शाळा संस्थानी, नगर सेवकांनी, सरपंच, व विध्यार्थी यांनी सज्ज होण्याची गरज आहे. आज रोजी कोरोना महामारी सारख्या रोगाशी संपूर्ण देश लढत आहे. ह्याचे कारण वयक्तिक अस्वछता आहे. अश्या विविध समस्यानी आपण लढत आहोत. जर आपण स्वच्छता ठेवली नाही तर आपले आरोग्य धोक्यात जाईल व येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही.
हे शक्य करण्यासाठी गावातील सुज्ञ नागरिकांनी एकजुटीने येऊन सरपंच, किंवा ग्रामसेवक यांच्या अध्यक्षतेखाली पुढील अभियान राबून स्वच्छ भारत अभियान सप्ताह 26 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान सर्व जनतेने आपले गाव स्वच्छ करून आपला आदर्श इतरांना दयावा. देश स्वच्छ करण्यासाठी गावापासून सुरुवात करण्याची गरज आहे.ज्या गावची स्वच्छता उल्लेखनिय असेल अशा गावातील संबंधित लोकांना संस्थेच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल.तरी सर्व सुज्ञ नागरिकांनी या अभियान मध्ये सहभागी व्हावे.असे आवाहन संस्थापक अध्यक्ष पंकज पोहरे यांनी जनतेला केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: