तांदूळ वाहनात भरतांना ग्रामस्थांनी मुख्याध्यापकाला रंगेहात पकडले

नासिर शहा
प्रतिनिधी पिंपळ खुटा
पातुर तालुक्यातील चानि पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिंपळ खुटा येथील प्रकार शिक्षण विभागामार्फत शालेय पोषण आहार दिला जातो त्यासाठी शाळांना तांदूळ यासह कडधान्याची वितरण करण्यात येते परंतु काय मुख्याध्यापक तांदूळ चक्क काळ्या बाजारात विकतात शाळेतील तांदळाचे कट्टे मालवाहू वाहनांमध्ये भरतांना मुख्याध्यापक व चालक यांना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडल्याची घटना पिंपळखुटा येथील शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली मुख्याध्यापक व चाललंय शाळेतून पसार झाले पिंपळखुटा येथील दि पी ई एस विद्यालयाच्या एका खोलीतून मुख्याध्यापक चव्हाण आणि एम एच 30 3601 क्रमांकाच्या एका मालवाहू वाहनाचा चालक तांदळाचे कट्टे वाहनांमध्ये भरत असल्याचे ग्रामस्थांना दिसून आले शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळेला मिळालेल्या तांदळाचा साठा काळ्या बाजारात विकण्यासाठी येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे वर्गखोलील तांदळाच्या दहा कट्टा त्यापैकी पास कट्टे वाहनांमध्ये भरत असताना ग्रामस्थांनी मुख्याध्यापक चव्हाण आणि वाहनचालकास पकडले परंतु दोघेही शाळेच्या आवारातून पसार झाले या प्रकरणात पातुर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली गावकऱ्यांनी मुख्याध्यापकांच्या घरावर धाव घेऊन त्यांला धारेवर घेतले परंतु मुख्याध्यापक घरात दबा करून बसला या परिसरात मोठ्या प्रमाणात रेशनचा काळाबाजार होत आहे पुरवठा विभागाच्या आशीर्वादाने रात्रंदिवस शालेय पोषण आहारातील तांदुळाचा काळाबाजार होत असल्याचे अनेक प्रकरणे उघडकीस आले आहेत विद्यालयाच्या आवारात शालेय पोषण आहार भरलेल्या वाहनाच्या चालकांनी एक व्यक्तीला उडविण्याचा प्रयत्न केला घटनेची माहिती मिळताच गावातील शेकडो ग्रामस्थ विद्यालयाच्या आवारात गोळा झाले एका मजुराला ताब्यात घेतले आहे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचनामा व कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती