केंद्र सरकारच्या कांदा निर्यात विरोधी धोरणाचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे जाहीर निषेध

नितीन हुसे
शहर प्रतिनिधी
तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निर्यात बंदी उठवण्यासाठी निवेदन सादर….
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रांताध्यक्षा सौ.रूपालीताई चाकणकर यांच्या सुचनेनुसार तसेच अकोला जिल्हा निरीक्षकसौ.सोनालीताई ठाकूर,महिला जिल्हाध्यक्षा सौ.उज्वलाताई राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बाळापूर ता.अध्यक्षा सौ.सुनिताताई ताथोड यांच्या नेतृत्वात 18 सप्टेंबर रोजी कांदा निर्यात बंदी बाबत तहसील कार्यालय बाळापूर येथे दुपारी 1:00 वाजता महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बाळापूर च्या वतीने तहसील कार्यालया समोर आंदोलन करत केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवुन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. कारण शेतकऱ्यांना जर सुखी करायचे असेल तर शेतकऱ्यांचा जो शेतमाल आहे त्या मालाला हमी भाव आणी निर्यातीसाठी परवानगी दिली पाहिजे. तसेच त्यांना सर्व सोईपण उपलब्ध करून दिल्या पाहिजेत असे सुचवित बाळापूरचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी साहेब यांना निवेदन देण्यात आले.व दिड किलो कांदासुद्धा भेट म्हणून दिला.मोदी सरकार शेतकरी विरोधी वागत आहे.ज्या पिकाला शेतकरी आपल्या पोटच्या गोळयाप्रमाणे जपतो ज्या पिकाची रात्रंदिवस काळजी घेतो ते पिक जर त्याला बेभाव विकावे लागत असेल तर तो बळीराजा कसा जगु शकेल आणि या अशा अविचारी निर्णयामुळेचे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतच आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी टिकला तरच शेती पिकेल.यावरुन हे सिद्ध होते की केंद्रातील मोदीसरकार ही सर्वसामान्यांच्या जिवावर उठली असुन केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय हा शेतकर्यांना मारक असुन आत्महत्येस प्रव्रुत्त करणारा असुन तो घेतलेला घातक निर्णय तात्काळ मागे घ्यावा असा निवेदनातुन निषेध व्यक्त केला आहे
याप्रसंगी बाळापूर शहर अध्यक्षा शीलाताई काळे,ता.उपाध्यक्ष सौ.रमाताई तायडे,ता.सहसचिव कनिजा परविन खान,शहर उपाध्यक्ष शाहिन परविन शेख,सहसचिव रुपनंदाताई तायडे,श.सचिव मालिनीताई गाडेकर,श.सदस्य सिंधुताई वानखडे,श.सदस्य सपनाताई तायडे,पुष्पाताई धुरंधर,उज्वलाताई तायडे,ज्योतीताई तायडे,मंगलाताई डोंगरे,योगीताताई जुंबळे इ. उपस्थित होत्या.