कोरोणामुळे मृत्यु झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत द्या

आरोग्य मंत्र्यांना पाठविले एसएमएस तहसीलदारांना निवेदन
अविनाश पोहरे / पातूर
पातूर : कोरोनानं बळी गेलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रूपयांची मदत मिळावी, पत्रकार विमा योजना तातडीने लागू करावी, पत्रकारांसाठी प्रत्येक रूग्णालयात ऑक्सीजन, व्हेंटीलेटरसह त्वरीत बेड उपलब्ध करावा आणि पांडुरंग रायकर आणि संतोष पवार यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चौकशी समितीचे अहवाल जाहीर करून जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत अशा मागण्या चे निवेदन अकोला जिल्हा पत्रकार संघाचे सिद्धार्थ शर्मा जिल्हाध्यक्ष शौकतअली मिरसाहेब सरचिटणीस प्रमोद नांदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यांना पातूर तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले यासोबतच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एन देशमुख विश्वस्त किरण नाईक यांच्या आवाहनानुसार राज्याचे आरोग्य मंत्रीराजेश टोपे यांना एसएमएस पाठवून आंदोलन करण्यात आले यावेळी शंकरराव नाभरे तालुका अध्यक्ष मोहन जोशी प्रदीप काळपांडे उमेश देशमुख संगीता इंगळे सतीश सरोदे सचिन ढोणे अब्दुल कूद्दुस निशांत गवई जयंत पुरुषोत्तम प्रवीण दांडगे पंजाब इंगळे किरण कुमार निमकंडे प्रमोद कढोणे रामेश्वर वाडी अजित आळत श्रीकृष्ण शेगोकार फरहान राहुल शेगोकार सह हजारो पत्रकार उपस्थित होते.