ताज्या घडामोडी

तेल्हारा येथे पत्रकारांचे एसएमएस पाठवा आंदोलन व तहसीलदार यांना निवेदन.

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा

तेल्हारा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुटूंबियांना शासनाने 50 लाख रुपयांची मदत करावी, कोरोना काळात विमा संरक्षण द्यावे, दिवंगत पत्रकार संतोष पवार व पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूची चोकशी करावी,कोविड हॉस्पिटलमध्ये पत्रकारांसाठी बेड राखीव ठेवण्यात यावे या प्रमुख चार मागण्यासाठी दि.१८ सप्टेंबरला तेल्हारा तालुक्यातील पत्रकारांनी आरोग्य मंत्री यांना संदेश पाठवून तेल्हारा तहसीलदार राजेंद्र सुरळकर यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
मराठी पत्रकार परिषदेचे नेते एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक व परिषदेने संपूर्ण राज्यभर दिनांक 18 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी एसएमएस पाठवा आंदोलन पुकारले त्यावरून अकोला जिल्हा पत्रकार संघाने केलेल्या आवाहन नुसार हे आंदोलन तेल्हारा तालुक्यातून राबविण्यात आले व उपरोक्त मागणीचे एसएमएस आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना त्यांच्या 9619111777 या भ्रमणध्वनीवर पाठवीले गेले. मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शोकतली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजुरकर, उपाध्यक्ष रामदास वानखेडे, गजानन सोमाणी,चिटणीस संजय खांडेकर,विजय शिंदे , सत्यशील सावरकर,प्रदीप काळपांडे , उमेश देशमुख, उमेश अलोणे, जयेश जगड यांच्या मार्गदर्शनाखाली तेल्हारा तालुका पत्रकार संघाने निवेदन मॅसेज पाठवा आंदोलन केले निवेदनावर तालुका अध्यक्ष प्रल्हादराव ठोकणे, सुरेश शिंगणारे, सत्यशील सावरकर, अनंत अहेरकर, रामभाऊ फाटकर, सदानंद खारोडे, धर्मेश चौधरी, सोशल मीडिया सेल जिल्हा अध्यक्ष निलेश जवकार, विशाल नांदोकार, विद्याधर खुमकर, परमेश्वर इंगळे, राहूल मिटकरी, आनंद बोदडे, पंकज भारसाकळे इत्यादी स्वाक्षरी आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: