लोहारा येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत आशा वर्कर कडुन आरोग्य तपासणी

ग्रामीण प्रतिनिधी/ संतोष मोरे लोहारा
लोहारा :- बाळापुर तालुक्यातील ग्राम लोहारा येथे कोरोना या विषाणूचा संसर्गजन्य रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उध्दवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून सर्पुण महाराष्ट्र राज्यांत माझे कुटुंब माझी जबाबदारी राबविण्यात येत आहे. कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. पालकमंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये आरोग्य पथका मार्फत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेत लोहारा येथील सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे . ही मोहीम उरळ पि एस सी मार्फत वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षाली ताडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आशा वर्कर आपआपल्या गावी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवली जात आहे. ही मोहीम लोहारा येथे राबवताना आशा वर्कर छाया मोरे सेवक प्रणय मोरे यांनी लोहारा येथे घरोघरी जाऊन कुटुंबातील सर्व नागरिकांची तपासणी करीत आहेत.