पंतप्रधान नरेन्द्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन ‘आर्सेनिक अल्बम ३०’ गोळ्यांचे वाटप

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेन्द्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमीत्याने भाजपा युवा मोर्चाच्या वतीने दहीगांव येथील वृद्धाश्रमात ‘आर्सेनिक अलब्म ३०’ या होमियोपैथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनावर उपाय म्हणुन रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आर्सेनिक अलब्म ३० या होमिओपॅथिक औषधे गोळ्यांचे वृद्धाश्रमातील वृध्दांना वाटप करण्यात आले भाजपाचे अकोला जिल्हा सरचिटणिस केशव ताथोड, तेल्हारा तालुकाध्यक्ष गजानन उंबरकार, तालुका सरचिटणिस ज्ञानेश्वर सरप यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी भाजपा युवा मोर्चा अकोला जिल्हा सरचिटणिस किरण पाटील अवताडे, सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ हिंगणकार, जिल्हा सचिव विशाल पाटील कोकाटे, सुमित गंभिरे, दिलीप पवार, डिगांबर पांडे, निखिल अवताडे, सचिन जस्ताब, विवेक उर्फ भैय्या अवताडे, रवी काकड, स्वप्नील अवताडे, वैभव चंदन, सागर सोनाग्रे, दिनेश काळपांडे, अथर्व धरमकार, हर्ष शर्मा, शुभम चिंचोलकार, अक्षय अवताडे, विठ्ठल चिंचोलकार, शुभम इसापुरे, योगेश मुर्हेकर, हरीश इंगोले यांच्यासह भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.