ताज्या घडामोडी

“सर्व धर्माची शिकवण एकच” जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची संकल्पना

पातूर पंचायत समिती सभागृहा मध्ये सर्वधर्माच्या प्रतिनिधींनी दिला मानवतेचा संदेश

अविनाश पोहरे / पातूर

पातुर : जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी सर्व धर्माचे स्थानिक धर्म प्रतिनिधी व सर्व धर्मांचा एक संदेश या संकल्पनेतून पुस्तकाचे विमोचन अकोला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सर्वधर्मसमभाव या संदेशाचे नागरिकांनी आचरणात आणण्याकरिता प्रत्येक तालुक्या मध्ये बैठक घेऊन नियोजन केले व त्याच प्रकारे पातुर शहरांमध्ये पातूर पंचायत समिती हॉलमध्ये पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन सिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली व पातुर तहसीलदार दीपक बाजड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी प्रमुख सर्व धर्माचे स्थानिक धर्म प्रतिनिधी, ह-भ-प शामरावजी फुलारी महाराज, बुद्धाचायऀ मनोहर खंडारे, ॲड, अमजद काजी, मज्जित चे मौलवी मुक्ती हकीम, बालिका कुमारी वक्ता शरयू राजेश उगले, यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे संकलन करण्यात आले. यावेळी हिंदू ,मुस्लिम, बौद्ध या सर्व स्थानिक धर्म प्रतिनिधी मानवता हा एकच धर्म असून असा संदेश दिला आहे. तर पातूर येथील वक्ता कुमारी शरयू राजू ऊगले ईने आपल्या व्याख्यानातून प्रत्येक धर्मा विषयी महत्त्वाचे मानवतेचे देशातील संतांचे विचार व्याख्यानातून मांडले व उपस्थित सर्व नागरिकांचे लक्ष वेधले अशा प्रकारे हा कार्यक्रम पातूर येथील पंचायत समिती हॉलमध्ये संपन्न झाला यावेळी, आपल्या शब्द शैलीतून संचालन करणारे निलेश गाडगे यांनी उपस्थित मान्यवरांचे मने जिंकली यावेळी पातुर ठाणेदार गजानन ठाकूर यांनीसुद्धा मानवतेचा संदेश दिला व अध्यक्षीय भाषणामध्ये पातुर तहसीलदार दीपक बाजड आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सर्वधर्मसमभाव असा संदेश दिला तर यावेळी आभार प्रदर्शन योगेश जवुळकार यांनी केले पातुर पोलिस स्टेशनचे वाहतूक नियंत्रण पोलीस वर्मा , कर्मचारी भवाने मेजर, सोहेल खान , मनीष घुगे, होमगार्ड सचिन पाटील, प्रशांत हरणे, यांचे सा सहकार्य लाभले उपस्थित मान्यवर मध्ये पातूर नगरपरिषद सदस्य तसेच पातुर शहरातील सामाजिक संघटनेचे प्रमुख व सर्व मंडळाचे अध्यक्ष आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: