आय.टी. आय.च्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना फायदा प्रवेश अर्ज त्रुटी पूर्ततेसाठी अखेर पर्याय उपलब्ध

रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांच्या मागणीला यश
अविनाश पोहरे / पोहरे
अकोला : आय.टी. आय. ह्या व्यावसायिक अभ्यासक्रम मध्ये शिक्षण महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ऑनलाईन प्रवेश प्रणाली मध्ये भरले परंतु प्रवेश अर्ज भरत असताना विद्यार्थ्यांनकडून नकळत चुका झाल्या त्यामुळे त्याचे प्रवेश अर्ज हे त्रुटी मध्ये टाकण्यात आले.ही सर्व प्रवेश प्रक्रिया व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य द्वारा राबविण्यात येत असल्यामुळे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रवेश अर्जामधील त्रुटी सुधारण्याकरिता पर्यायी पर्याय उपलब्ध नसल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य हे अंधारमय झाले होते कारण तीन गुणवत्ता यादी जाहीर होईपर्यंत गुणवत्तेत विद्यार्थी पात्र असून फक्त प्रवेश अर्जामध्ये त्रुटी असल्यामुळे विद्यार्थी ह्या प्रक्रियेच्या बाहेर फेकला जायचा कारण पहिली गुणवत्ता यादी ही प्रकाशित झाली होती.परंतु रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद चे अकोला जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांनी संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य व सहसंचालक अमरावती विभाग ह्यांना ई मेल द्वारे 15 सप्टेंबर रोजी प्रवेश अर्जामध्ये त्रुटी असल्यास ती दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाईन अर्जामध्ये पर्याय उपलब्ध करून द्या अशी मागणी केली होती व 16 सप्टेंबर रोजी व्यक्तिशः प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोला ह्यांना निवेदन सुद्धा दिले होते त्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे संचालक व महाराष्ट्रातील विभागाचे सहसंचालक ह्याची ऑनलाईन तात्काळ मीटिंग घेऊन सदर मागणीला गांभीर्याने घेऊन दूसरी गुणवत्ता यादी प्रकाशित होण्याच्या आधी निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना आपल्या प्रवेश अर्जामध्ये असलेल्या त्रुटी पूर्ततेसाठी पर्याय उपलब्ध करून दिला असून त्याची मुदत ही दिनांक 17 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजेपासून तर 20 सप्टेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.व सर्व प्रक्रिया झाल्यानंतर प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल तरी सर्व आय.टी. आय.ह्या व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन प्रणाली नुसार अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जाची त्रुटी पूर्तता तात्काळ करून घ्यावी असे सर्व विद्यार्थ्यांना जाहीर आवाहन रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांनी केले असून संचालक दीपेंद्र सिंह कुशवाह व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य ह्याचे आभार मानले आहे.