उड्डानपुलाला सम्राट अशोक व छत्रपती संभाजी राजांचे नावे द्या ! सम्राट अशोक सेना यांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन

महावीर अवचार / आसोला
अकोला शहरातील मुख्य मार्गावर होत असलेल्या उड्डानपुलाला नांव देण्या संदर्भात सम्राट अशोक सेना अकोला जिल्हा पदाधीकाऱ्यांनी व आज जिल्हाधीकारी जितेंद्र पापळकर यांची भेट घेतली. शहरातील अशोक वाटीका ते रेल्वे स्टेशन पर्यंत नवीन बनविन्यात येत असलेल्या उड्डानपुलाला सम्राट अशोक यांचे नांव तर रेल्वे गेट डाबकी रोड ते लुंम्बिनी नगर पर्यंत बनवत असलेल्या उड्डानपुलाला छत्रपती संभाजी राजे यांचे नाव देण्यात यावे. या मागणीचे निवेदन सम्राट अशोक सेना प्रमुख पै.आकाश सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी सम्राट अशोक सेनेचे कार्यकर्ते युवराज अवचार, दिपकर सावळे,अनील गुळदे, अनिरूद्ध तेलगोटे, शेषराव अवचार, जिवन सुरवाळे, आकाश वानखळे, रवी गवई, सचिन दंदी, सुशिल सिरसाट, अक्षय सिरसाट, मंगेश वानखडे, रोशन तायडे, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.