रुग्ण सेवा न देणाऱ्या डॉक्टर्सवर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर
अनंतकुमार गवई
नवी मुंबई
आपत्कालीन परिस्थितीत कोविड १९ च्या रुग्णांना सेवा न देणाऱ्या डॉक्टरांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू गवळी उपशहर प्रमुख महेश खैरनार यांच्या शिष्टमंडळाने नगर विकास मंत्री शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
पनवेल व रायगड शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे . याबाबत नुकतेच मुंबई मंत्रालय येथे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पनवेल महानगरपालिकेतील भोंगळ कारभारावर आसूड ओढले. मागील पाच दिवसांपासून पनवेल महानगरपालिकेच्या नियंत्रणात असणाऱ्या कोविड -१९ उपजिल्हा रुग्णालयात खाजगी डॉक्टरांनी सेवा देणे बंद केल्याच गंभीर प्रकरण नगर विकास मंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणण्यात आले. शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या पुढाकाराने शिवसेनेतर्फे ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू गवळी उपशहर प्रमुख महेश खैरनार यांच्या शिष्टमंडळाने मंत्री महोदयांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
सद्यस्थितीत महाराष्ट्रात व देशात राष्ट्रीय अपत्ति कायदा तसेच संसर्गजन्य प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे मागील पाच दिवसांपासून पनवेल महानगरपालिकेच्या नियंत्रणात असणाऱ्या कोविड -१९ उपजिल्हा रुग्णालयात खाजगी डॉक्टर का सेवा देत नाही याबाबत पालिका आयुक्तांनी आज पर्यंत दाखवलेली निष्क्रियता याचा उहापोह करून पनवेल महापालिका हद्दीत झालेल्या ३५० मृत्यूबाबत व आयुक्तांच्या निष्क्रियेते बाबत शिवसेनेने नाराजी व्यक्त करून पनवेल महापालिकेवर कार्यक्षम महापालिका आयुक्त सनदी अधिकारी नेमावा तसेच आपत्कालीन परिस्थितीत कोविड १९ च्या रुग्णांना सेवा न देणाऱ्या डॉक्टरांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे. मुख्य सचिव संजीव कुमार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य व डॉक्टर प्रदीप व्यास, व प्रधान सचिव नगर विकास यांना सादर करण्यात आले आहे. रायगड मधील व पनवेल महानगरपालिकेतील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याचे रक्षण करण्यास शिवसेना प्रतिबद्ध असल्याचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी स्पष्ट केले आहे.