पातुर तालुक्यातील चोंडी येथील त्रस्त युवकांना टायगर ग्रुप चे अध्यक्ष तानाजी जाधव व टायगर ग्रुप चे पैलवान अनिकेत घुले यांनी केली सुटका

टायगर ग्रुप अकोला जिल्हा सदस्य राहुल वाघमारे यांच्या प्रयत्नांना यश
अविनाश पोहरे / पातूर
पातुर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील चोंडी येथील 25 पैकी काही युवक वाशिम जिल्ह्यातील होते यांना नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या अमोल ताजणे या इसमाने पुणे राजनगाव एमआयडीसी येथे घेऊन गेला असता त्यांना तिथे कॉन्ट्रॅक्ट बेस वर कामाला लावले व त्यांच्या नावाखाली पैसे घेऊन पसार झाला ही गोष्ट मुलांच्या लक्षात येता त्यांनी विचारपूस केल्यास कंपनीच्या व्यक्तीने त्यांना मारहाण करून व जेवण बंद करून तब्बल चार दिवस एका इमारतीमध्ये कोंडून ठेवले व त्यांना मानसिक त्रास दिला व काम करण्यासाठी युवकांना मजबूर केले , युवकांनी टायगर ग्रुप अकोला जिल्हा सदस्य राहुल वाघमारे मोबाईल वरून संपर्क साधून सर्व झालेल्या प्रकाराची आपबीती सांगितली व तात्काळ राहुल वाघमारे यांनी टायगर ग्रुपचे अध्यक्ष पैलवान तानाजी जाधव यांना सर्व प्रकरण सांगितले व या मुलांची पुणे पोलिसांच्या मदतीने सुटका करण्यात आली.