ताज्या घडामोडी

कुस्ती मल्लविद्या महासंघाने ग्रामीण भागातील पैलवानांना राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करण्याकरिता घेतला पुढाकार

कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र जिल्हापदी व तालुका स्तरावर नियुक्ती

अविनाश पोहरे / पातूर

पातूर : पातूर येथील श्री शिदाजी महाराज व्यायाम शाळा येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य च्या वतीने तालुका व जिल्हास्तरावर पद नियुक्ती करण्यात आली त्या कार्यक्रमाला कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र अकोला जिल्हा अध्यक्ष पैलवान हर्षल आप्पा घाटे आणि पैलवान निलेश कवडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी अकोला जिल्हा अध्यक्ष व उपाध्यक्ष, यांनी ग्रामीण भागातील पैलवानांना महाराष्ट्र राज्य स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता या संघटनेने नव्याने पाऊल उचलले गोरगरीब व मजूरी करत असलेले मुलं ज्यांना राज्यस्तरावर व देशपातळीवर अंगामध्ये हूणर असून सुद्धा आर्थिक परिस्थितीच्या अभावी या मुलांना राज्य व देशपातळीवर यांना व्यासपीठ उपलब्ध होत नसल्याने कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी या मुलांना त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी ही संघटना समोर आली आहे यावेळी जिल्हा अध्यक्ष पैलवान हर्षल आप्पा घाटे पैलवान निलेश कवडे व जिल्हा उपाध्यक्ष पैलवान मंगेश गाडगे यांच्या हस्ते पद नियुक्ती करण्यात आली. अकोला जिल्हा उपाध्यक्ष पदी मा. मंगेश गाडगे यांची निवड करण्यात आली तर जिल्हा सदस्य राजू भाऊ आवटे पातूर तालुका अध्यक्ष पदी पैलवान अक्षय रवींद्र तायडे, पातुर तालुका उपाध्यक्षपदी पैलवान महेश उत्तम बोचरे यांची निवड करण्यात आली तसेच पैलवान अजय सुनील हाडके, तालुका संघटक पवन अरुण तायडे, सहायता कक्ष प्रमुख वस्ताद चंदू जयराम वानखडे, ज्येष्ठ मार्गदर्शन पातूर तालुका पै. सागर दिनकर हरणे, शहर अध्यक्ष पैं.ज्ञानेश्वर घनशाम बंड ,शहर उपाध्यक्ष हृषीकेश संजय पेंढारकर, सोशल डिझायनर सुनील गाडगे, सोशल मीडिया प्रमुख पातूर तालुका त्यांची निवड करण्यात आली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: