ताज्या घडामोडी

नो मास्क नो पेट्रोल डिझेल ; अकोला पोलीस आणि वाशिम अकोला जिल्हा पेट्रोलियम डिलर्स अससोसिएशन ह्यांचा संयुक्त उपक्रम

निलेश किरतकार

मुख्य संपादक


अकोला शहर आणि जिल्ह्यात कोविड 19 विषाणू चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नागरिकांना वारंवार आवाहन केले आहे व काही मार्गदर्शक तत्वे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे त्या मध्ये सर्वात महत्वाचे मार्गदर्शक तत्व म्हणजे घराबाहेर गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळून मास्क परिधान करणे हे होय, पण बरेच नागरिक मास्क न घालता गर्दीच्या ठिकाणी वावरतांना दिसतात, पोलीस प्रशासन अश्या मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाया दररोज करतातच परंतु पोलिसांना इतरही अनेक कामे असल्याने पोलिसांची नजर चुकवून बरेच नागरिक मास्क न घालण्यातच धन्यता मानतात, ह्या साठी लोकसहभाग व जनजागृती करणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अकोला जी श्रीधर ह्यांचे निर्देशा प्रमाणे वाशिम अकोला पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन चे पदाधिकारी आणि शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी ह्यात पुढाकार घेऊन आज पासून अकोला शहरातील सर्व पेट्रोल पंपावर नो मास्क नो डिझेल ह्या मोहिमेची सुरवात केली असून त्याची सुरुवात अशोक वाटिका चौका जवळील वाजीबदार पेट्रोल पंपा पासून करण्यात आली ह्या वेळी वाशिम अकोला जिल्हा पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन चे अध्यक्ष नवीन प्रकाश सिंह ठाकूर, पदाधिकारी नरेश अग्रवाल, महेंद्र अग्रवाल, गुरुपाल सिंह नागरा, प्रभाजीतसिंह साहनी, हेमंत आनंदानी, राजेश चावला, दीपक म्हैसने, सुरेश वानखेडे, श्रीकांत रामटेके, व शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके उपस्थित होते, ही मोहीम जिल्हाभर राबविणार असल्याचा मानस पेट्रोलियम असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: