बाळापूर शहरात विविध उपक्रम राबवून युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा.

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस युवासेना बाळापूर शहराच्या वतीने विविध उपक्रम राबवित साजरा करण्यात आला. युवासेना अकोला जिल्हा विस्तारक जितेश गुप्ता यांच्या आदेशानुसार बाळापूर
विधानसभा मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख, युवासेना ग्रामीणचे जिल्हाप्रमुख दिपक बोचरे,तालुका प्रमुख महेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना शहर प्रमुख श्याम बहुरूपे व पदाधिकाऱ्यांनी बाळापूर शहरात कोरोनाच्या काळात कर्तव्ये बजावत असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्क चे वाटप केले.तर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.तर ग्रामिण रुग्णालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून आदी उपक्रम राबविण्यात आले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख आनंद बनचरे,युवासेना शहरप्रमुख श्याम बहुरुपे,युवासेना उपशहर प्रमुख कृष्णा घाटोळ, सरचिटणीस विकास रोम,गजानन जामोदे,हरिनाथ विधाते,जेयश गाडेकर,तरुण सिरसाट,शिवा गवई,आदित्य गाडेकर,प्रकाश वाकोडे,दर्शन इंगळे,शैलेश हतोले,अभिजित रौंदळे,ऋषिकेश नेरकर यांचेसह युवासेनेचे आजी-माजी पदाधिकारी,मित्र परिवार उपस्थित होता.