ताज्या घडामोडी
बाळापूर येथील पोलीस बांधवांना माक्स चे वाटप.

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
बाळापुर : जालन्यातील नामांकित कंपनी राजुरी स्टील हे दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवित असून,त्यांनी यावर्षी सुद्धा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री कैलास लोया,व कंपनीचे डायरेक्टर श्री. शिवकुमार लोहिया, संतोष मुंदडा,यांनी कोरोना महामारी मध्ये बाळापूर येथील सर्व पोलिस बांधवांना, बाळापूर येथील महेंद्र स्टील चे संचालक श्री. महेंद्र अशोक धनोकार यांच्या हस्ते बाळापूरचे ठाणेदार श्री.दत्तात्रय आव्हळे यांच्या उपस्थितीत माक्स चे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी बाळापुर सर्व पोलीस कर्मचारी,व महेंद्र स्टील बाळापूर चे कर्मचारी उपस्थित होते.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.