पातूर येथे कोविड १९ चे पालन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

अविनाश पोहरे / पातूर
पातुर दि. १४/०४/२०२१ खानापूर रोड कृषी उत्पन्न बाजार समिती गेट नंबर दोन येथे प्रहार बहुउद्देशिय संस्था आस्टूल चे संस्थापक अध्यक्ष अमोल प्रकाश करवते यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. १४ एप्रिल २०२१ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन सोशल डिस्टन्स च पालन करून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष अमोल प्रकाश करवते यांनी थोडक्यात मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित मान्यवर म्हणून लाभलेले सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील कुकडकर, सुभाष राखोंडे , गौतम पाटील,राजकुमार खंडारे (पंडीत सचिन अरबाळ नारायण शिरेकार ,राहुल वजाळे, राजकुमार खंडारे पंडीत, अतिष चव्हाण, इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.