आस्टूल येथे कोविडचे पालन करून महात्मा फुले यांची जयंती साजरी.

प्रहार बहुउद्देशीय संस्था यांचा पुढाकार..!
अविनाश पोहरे / पातूर
पातुर तालुक्यातील आस्टूल येथे प्रहार बहुउद्देशिय संस्था आस्टूल चे संस्थापक अध्यक्ष अमोल प्रकाश करवते यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. ११ एप्रिल २०२१ रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन सोशल डिस्टन्स च पालन करून स्त्री शिक्षणाचे जनक,महिला शिक्षणाचा पहिला खंबीर पाठीराखा आणि बहुजन समाजाला धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आयुष्य वेचणारे थोर समाजसुधारक क्रांतिसुर्य महात्मा जोतीराव फुले यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे पुष्प पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला व संस्थापक अध्यक्ष अमोल प्रकाश करवते यांनी थोडक्यात मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित मान्यवर म्हणून लाभलेले सामाजिक कार्यकर्ते विनोद इंगळे ,सुजित इंगळे ,रविकांत कांबळे ,शिलराज ढोले, ऋषिकेश घुगे ,पंकज भारसाकळे ,धीरज करवते अंकुश इंगळे, सुनील इंगळे, सुनील करवते, विक्की इंगळे,विशाल इंगळे, धीरज शिरसाठ ,ऋषिकेश इंगळे, राजकुमार इंगळे इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती प्रहार सेवक अमोल करवते यांनी दिली आहे.