रक्तदानातून बाबासाहेबांना अभिवादन

अविनाश पोहरे / पातूर
पातुर :14 एप्रिल 2021भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त नांदखेड गावातील युवा पिढीने रक्तदान करून बाबा साहेबांचा वाढदिवस साजरा केला.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने ग्रामपंचायत नांदखेड येथे साजरी करण्यात आली. “बाबासाहेब आमचे बापच नसून ते आमच्या कष्टकरी युवा बांधवांच्या रक्ताच्या थेंबा थेंबात आहे” याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे नांदखेड येथे 30 युवा बांधवांनी रक्तदान करून बाबासाहेबांची 130 वी जयंती साजरी केली.
कार्यक्रमाला मार्गदर्शन आकाश भाऊ शिरसाट जिल्हा परिषद सभापती अकोला व श्री गवळी साहेब पातुर पोलीस स्टेशन लाभले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल गवई (राहुल बहुद्देशीय संस्था नांदखेड) यांच्या वतीने आयोजन करण्यात आले. तसेच कार्यक्रमाला सरपंच विजय इंगळे, उपसरपंच बाबुराव माने, ग्रामसेवक ऊडाळ साहेब, तंटामुक्ती अध्यक्ष हरिदास माने ,पोलीस पाटील वनिता बोचरे ,डॉ. पाकदूने,अर्जुन टप्पे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पातुर ,चंद्रमणी वानखडे ,नितेश इंगळे, प्रकाश वानखडे उपस्थित होते. राहुल गवई, नितेश इंगळे, प्रकाश वानखडे, सचिन गवई, मंगेश जाधव, मिलिंद वानखडे, शीलवंत तायडे, प्रवीण वानखडे, आकाश वानखडे, बाबुराव माने, अंकुश कांबळे, मनोज गवई ,वैभव खंडारे, संतोष जाधव ,अमोल वानखडे, सुनील गवई, प्रकाश तेलगोटे, देवानंद डोंगरे, लखन अवचार, अमोल उपर्वट, इत्यादी तरुणांनी रक्तदान करून बाबासाहेबांचा वाढदिवस साजरा केला त्यांच्या या उपक्रमाचे सर्व परिसरात स्तुती करत आहेत.