ताज्या घडामोडी

आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने अभ्यासू व्यक्तिमत्त्वास मुकलो – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

 

मुंबई दि.10 :- देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने आपण एका  अभ्यासू व्यक्तिमत्वास मुकलो, अशा शब्दांत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

आपल्या मतदारसंघातील विविध समस्या सोडवण्यासाठी ते सदैव क्रियाशील असत. सातत्याने शासन- प्रशासनासोबत पाठपुरावा करून, जास्तीत जास्त सोयी सुविधा आपल्या मतदारसंघातील जनतेला कशा मिळतील, यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असत. आपल्या मतदारांशी उत्तम जनसंपर्क ही त्यांची खासियत होती.गोरगरिबांचा आमदार म्हणून परिचित होते. सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता म्हणून परिसरात प्रचंड लोकप्रिय होते.

परमेश्वर त्यांच्या कुटुंबास हा आघात सहन करण्याची शक्ती देवो, ही प्रार्थना असे गृहमंत्री श्री. पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: