ताज्या घडामोडी
आजी माजी विद्यार्थ्यांकडून प्राचार्य डॉ.विनायक जायले सर ह्यांना यशस्वी सेवानिवृत्त झाल्याबद्दल निरोप

अकोला एक्सप्रेस न्यूज नेटवर्क, पातूर
पातूर शहरातील नामांकित डॉ.एच. एन. सिन्हा महाविद्यालय पातूर येथे प्राचार्य म्हणून नेहमी विद्यार्थ्यांना सातत्याने सहकार्य करणारे व सर्व विद्यार्थ्यांचे लाडके असणारे प्राचार्य डॉ.विनायक जायले सर ह्यांना सेवानिवृत्त झाल्याबद्दल महाविद्यालयातील आजी व माजी विद्यार्थ्यांकडून सरांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून निरोप देण्यात आला. ह्यावेळी आकाश हिवराळे,सागर इंगळे, अविनाश पोहरे, अर्जुन गहिलोत, अजिंक्य निखाडे, सुरज जंजाळ, कुणाल किरतकार आदींसह असंख्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.