पातुर तालुक्यातील खामखेड येथे गारपीट व वादळी पावसामुळे घर कोसळले

प्रहार सेवक अमोल करवते यांनी दिली भेट
पवन तांबे / ग्रामीण प्रतिनिधी, खामखेड
पातुर तालुक्यात शनिवारी झालेल्या गारपिटीमुळे पातूर तालुक्यातील खामखेड या गावातील नरेंद्र बंडोजी घायवट यांचे घर कोसळले यामध्ये टिन पत्रे व घरातील धान्याचे मोठे नुकसान झाले आहे तसेच भिंत जमीनदोस्त झाले आहेत नरेंद्र घायवट यांचे घर व भिंती धस्ता असल्याने शुक्रवारपासून पातूर तालुक्यात सुरू झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे त्यांनी घराबाहेर त्यांचे जवळच असलेल्या शेतामध्ये सहारा घेतला होता म्हणून घायवट परिवाराचा यामध्ये जीव बाल बाल बचावला आहे देव तारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे सदर कुटुंब या अपघातापासून बचावले आहे यामध्ये नरेंद्र घायवट यांचेसह त्यांची पत्नी दोन मुले व आई असा परिवार या घरांमध्ये राहत होता सोसाट्याचा वारा आणि शिकस्त घर यामुळे ते शेतामध्ये राहायला गेले होते या घटनेची माहिती पातूर तालुक्यातील प्रहार सेवक अमोल करवते व सागर लठाड यांना मिळताच त्यांनी तात्काळ या घटनेची दखल घेऊन कुटुंबाला भेट दिली आणि त्यांचे सांत्वन केले.तसेच प्रशासनाला याबाबतची सूचना करून सहकार्य करण्याचे यावेळी त्यांनी घायवट कुटुंबाला आश्वासन दिले.