समाजासमोर ठेवला नविन आदर्श विशाल नंदागवळी यांनी फळांचा केक कापुन केला वाढदिवस साजरा….

अविनाश पोहरे / संपादक
अकोला – दि २० मार्च २०२१ वाढदिवस म्हटला की एक वेगळाच आनंद प्रत्येकाच्या जीवनात असतो. वाढदिवसाला बेकरीमध्ये तयार केलेला केक कापून तो साजरा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात फळांचा केक कापण्याचा ट्रेंड आलायं. या ट्रेंडला नागरिकही भरभरून प्रतिसाद देत आहेत. नांदेड येथील वस्तु आणि सेवा कर विभागात सहाय्यक आयुक्त असलेले एकनाथ पावडे यांच्या पुढाकारातुन आता केक कापून नाही. तर फळे कापून वाढदिवस साजरा केला जातोय. केक कापण्यापेक्षा फळे कापून वाढदिवस साजरी करण्याची संकल्पना बळीराजासाठी सुखदायक आहे.
आपल्या महाराष्ट्रात चिकू, पेरू, केळी, संत्री, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, कलिंगड या फळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे जर फळांच्या केकची मागणी वाढली. तर नक्कीच फळ उत्पादक शेतकऱ्यांना चार पैसे मिळून त्यांचा फायदा होईल. तसेच मागणी वाढल्यानंतर शेतकरीही फळांचे उत्पादन घ्यायला मागेपुढे पाहणार नाही. बाजाराच्या मागणीवरच शेतकर्यांचं उत्पादन अवलंबून असतं. त्यामुळे हा ट्रेंड आपण सर्वांनी मिळून सुरू करु आणि तो आपणचं मोठा करूया अशा आशयाचा संदेश आपल्या वाढदिवशी विशाल नंदागवळी यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे आपण सर्वांनी हा उपक्रम पुढे सुरु ठेवावा असे आवाहन त्यांनी केले आहे. याप्रसंगी विशाल नंदागवळी यांचे आई -वडील, बहीण – भाऊ, प्रा. राहुल माहुरे,प्रा. ॲड. आकाश हराळ, अमित लोंढे, राहुल कुरे, विशाल इंगळे, अभय तायडे, श्रेयश शर्मा, नागसेन अंभोरे, उपस्थीत होते.