अकोलेकर आहेत चिमणी प्रेमी…चिमणी गणनेचा निष्कर्श

अविनाश पोहरे / अकोला एक्सप्रेस न्यूज
निसर्गकट्टा, प्राणीशास्त्र विभाग, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला व महात्मा फुले महाविद्यालय पातूर यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला जिल्हासाठी ऑनलाईन चिमणी गणना आयोजित करण्यात आली होती .या गणनेच 690 लोकांनी सहभाग नोंदविला होता. या गणनेत 7 प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते.
अकोल्यातील परिसरात 5ते 10 चिमण्या दिसण्याचे प्रमाण 33.9% , 10 ते 20 चिमण्या दिसण्याचे प्रमाण 38%, 50 ते 100 चिमण्या दिसण्याचे प्रमाण 22.2% तर चिमण्या न दिसण्याचे प्रमाण 5.9% आहे.
अकोल्याला जिल्हा12 महिने चिमण्या दिसण्याचे प्रमाण 42% आहे, उन्हाळ्यात 24.1%, पावसाळ्यात 13.3%। व हिवाळ्यात 20.6 % चिमण्या दिसतात.
सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या लोकांपैकी 89.7% लोकांनी आपल्या अंगणात चिमण्यांसाठी पाण्याचे भांडे ठेवले आहे.
तर 82.3% लोकांनी चिऊताईसाठी अन्नाची व्यवस्था केली आहे.
72.5% लोकांनी चिमणी साठी कृत्रीम घरटे लावले आहेत. तर 95.4 % लोकांनी त्यांच्या परिसरात चिमण्यांसाठी हक्काचा निवारा म्हणेज कृत्रिम घरटे लावण्याची मागणी केली आहे. तर फक्त 5% लोकांनी कृत्रिम घरटे लावण्यास नकार दिला आहे.
38.4% भागांमध्ये मोबाईल टॉवरच्या जवळपास चिमण्या राहतात तर 61.6% भागांमध्ये चिमण्या आहेत त्या भागात मोबाईल टॉवर नाही.
या सर्वे बाबत अधिक माहिती देतांना निसर्गकट्टाचे अमोल सावंत यांनी सांगितले की, अकोल्याला जिल्हातील चिमण्यांची स्थीती काय आहे व त्यांच्या संवर्धनासाठी काय उपाय करावे यासाठी या सर्व्हेचे आयोजन करण्यात आले होते. फक्त चिमण्यांची संख्याची आकडेवारी न काढता चिमणी संवर्धनासाठी किती लोक जागृत आहे हे पाहणे हा या सर्व्हेचा मुख्य उद्देश होता. पहिल्या वर्षी जरी आम्हाला कमी प्रतिसाद मिळाला पण दरवर्षी हा उपक्रम राबवून जास्तीत जास्त लोकांना या चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. या सर्व्हे मध्ये ज्या लोकांनी कृत्रीम घरटे लावण्याची इच्छा दर्शविली आहे त्यांना आम्हि घरटे उपलब्ध करून देणार आहोत.
या चिमणील गणनेला डॉ. मिलिंद शिरभाते, सह प्राध्यापक, प्राणीशास्त्र विभाग ,शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय व डॉ. अमृता शिरभाते, प्राणीशास्त्र विभाग, महात्मा फुले महाविद्यालय पातूर व कु.रोशनी लोमटे सहाय्यक प्राध्यापक याचे विशेष सहकार्य लाभले.