महात्मा फुले महाविद्यालय येथे जागतिक कोळी दिनानिमित्त व्याख्यान

अविनाश पोहरे / संपादक
दिनांक 17 मार्च रोजी प्राणीशास्त्र विभाग महात्मा फुले कला व विज्ञान महाविद्यालय पातुर येथे जागतिक कोळी दिनानिमित्त ऑनलाइन स्वरूपात विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले . सदर व्याख्यान ऑनलाइन यूट्यूब च्या माध्यमातून घेण्यात आले व्याख्यानाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून गुलाम नबी आजाद कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथील प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ अमित वैराळे हे होते. कोळी अर्थरपोडा प्रजातीचा arachnida क्लासचा कीटक आहे. कोळ्याला आठ डोळे आठ पाय व रेशीम सोडणारी ग्रंथी ज्याला आपण स्पिनरएट असे म्हणतात कोळ्याचे जाळे आंटीमायक्रोबियल व एनटीफंगल असते.कोळ्यांचे जाळ्या पासून बुलेटप्रूफ जॅकेट तयार केले जाते कोळी हा जंगलातील अन्नसाखळी चा प्रमुख घटक आहे असे सांगितले जाते. भारतामध्ये एकूण 1454 इतक्या प्रजाती आढळतात. सदर व्याख्यान ऑनलाइन स्वरूपात आयोजित करण्यात आले व व्याख्यानाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला व माहिती घेतली सदर कार्यक्रमाचे संचालन प्राणीशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ.अमृता शिरभाते यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. रोषणी लोमटे सहाय्यक प्राध्यापक यांनी केले. सदर व्याख्यानाला महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच संस्थेचे अध्यक्ष यांनी शुभेच्छा दिल्या.