बेरोजगार युवक युवतींसाठी जिल्हास्तरीय ऑनलाईन रोजगार मेळावा

द प्रोफेशनल करिअर अकॅडमी व पातूर तालुका विकास मंच यांचा अनोखा स्तुत्य उपक्रम
अविनाश पोहरे / पातूर
द प्रोफेशनल करिअर अकॅडमी पातूर व पातूर तालुका विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.
कोरोनामुळे झालेला वाढत्या बेरोजगारीचे प्रमाण लक्षात घेता जिल्हातील शहरी व ग्रामीण भागातील युवक युवतींकरिता सुवर्ण संधी असून या मेळाव्यातर्गत पुणे जिल्हातील विविध उद्योजकाकडून आयटीआय ट्रेड आणि पदवीधारक व इंजिनीरिंग सारख्या पदासाठी आवश्यक तांत्रिक पात्रताधारक उमेदवारांसाठी 500 रिक्तपदे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा (रिझूम) व शैक्षणिक कागदपत्रे शाळा सोडल्याचा दाखला, दहावीचे बोर्ड प्रमाणपत्र, आयटीआय डिप्लोमा प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट फोटो 8412003985 या व्हाट्सअँप क्रमांकावर शैक्षणिक पात्रतेनुसार आपले कागदापत्रे पीडीएफ स्वरूपात पाठवणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त युवक युवतींनी 30 मार्चपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावे असे आवाहन द प्रोफेशनल करिअर अकॅडमीचे संस्थाध्यक्ष पंकज पोहरे व पातूर तालुका विकास मंचचे संयोजक ठाकूर शिवकुमार बायस यांनी केले आहे.