ताज्या घडामोडी

अकोट महसूल भरारी पथकाच्या सलग दोन दिवसात चार कारवाया…. हरिष गुरव व त्यांच्या पथकाची धडक कारवाई…..

शरद भेंडे ग्रामीण प्रतिनिधी

महसूल पथकाने दि.27 व दि.28 रोजी अवैध गौणखनिजच्या चार वाहनांवर धडक कारवाई केली आहे.दि.27 रोजी हाफ बॉडी ट्रक mh 43 u 6007 चालकाचे नाव अहमदशाह याला एकाच पावतीवर दोनदा मुरुमाची वाहतुक करतांना पकडले.सदरचे वाहन पंचनामा करुन शहर पोलिस स्टेशन अकोट येथे लावण्यात आले.तसेच दि.28 रोजी पहाटे अकोलखेड येथे व मार्डी येथे अवैध रेतीची वाहतुक करतांना ट्रक्टर क्रमांक mh 04 ag 516 हे वाहन चालक अब्दुल साजीद अब्दुल शहीद, तर दुसरा मार्डी येथे mh 30 ab 8365 व तिसरा mh 30 ab 6209 ही तीन वाहने अवैध रेती वाहतुक करतांना पकडली.गाडी मालकाचे नाव सुरेंद्र मोरे आहे.सदरचे वाहन ग्रामीण पोलिस स्टेशन अकोट येथे लावण्यात आले.सदरची कारवाई महसूल पथकाचे प्रमुख नायब तहसीलदार हरिष गुरव, पथकातील प्रमुख सदस्य मंडळ अधिकारी नीळकंठ नेमाडे,तलाठी अनिल रावणकार,तलाठी राजाभाऊ खामकर,शैलेश मेतकर,सोलकर यांनी केली आहे.तरी हरिष गुरव व त्यांच्या पथकाने केलेल्या या धडक कारवाई मुळे अवैध मुरुम तसेच अवैध रेती चोरांचे धाबे दणाणले असुन यापुढे सुध्दा रेती चोरांची माहीती मिळाल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.अशी माहीती नायब तहसीलदार हरिष गुरव यांनी दिली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: