परदेशी चालीरीतींना बाजूला ठेवून केक न कापता कलिंगड कापून केला वाढदिवस साजरा.

63 कडुलिंबाची झाडे लावून वाढदिवस साजरा
अविनाश पोहरे / पातूर
पातूर : ३० मार्च २०२१ बेरार एज्युकेशन सोसायटी पातुर चे व्यवस्थापक श्री विजयसिंहजी गहिलोत यांचा 63 वा वाढदिवस अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.कोरोना च्या काळामध्ये सोशल डिस्टंसिंग नियमाचे पालन करत आपण सेवानिवृत्तीनंतर उत्कृष्ट प्रकारे शेती करून व नवनवीन प्रयोग करून चांगली शेती कशा प्रकारे केली जाते याचे उदाहरण त्यांनी प्रस्थापित केले. स्वतःचा वाढदिवस स्वतःच्या शेतातील कलिंगड कापून साजरा केला. परदेशी चालीरीतींना बाजूला ठेवून केक न कापता कलिंगड कापून आणि 61 नंबर महामार्गावर जी वृक्षतोड झालेली आहे त्याची भरपाई म्हणून वाढदिवसाच्या दिवशी 63 कडुलिंबाची झाडे लावून वाढदिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विजयसिंह गहिलोत प्रमुख अतिथी स्नेहप्रभादेवी गहिलोत,रणजितसिंह गहिलोत हायकोर्ट वकील नागपुर,प्राचार्य बी एम वानखडे,प्राचार्य एस एस श्रीनाथ, तुळसाबाई कावल विद्यालय बाभूळगाव उपप्राचार्य एस बी ठाकरे,उपमुख्याध्यापक तारापूरे, पर्यवेक्षक अंशुमनसिंग गहिलोत उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. पी.पी. वाकोडे प्रस्तावना प्राचार्य बी. एम.वानखडे मनोगत प्राध्यापिका के. व्ही. तायडे तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. ई यस.सुर्वे यांनी केले.