डॉ. एच. एन. सिन्हा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. किरण खंडारे रुजू

अविनाश पोहरे / संपादक
पातुर : स्थानिक डॉ. एच. एन. सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालय पातूर येथील प्राचार्य डॉ. व्ही. एन. जायले नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यानंन्तर महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. किरण खंडारे यांनी प्रभारी प्राचार्य म्हणून पदभार स्वीकारला. डॉ. सिन्हा महाविद्यालयामध्ये 20 वर्ष तर श्री शिवाजी महाविद्यालय अकोला या दोन्ही महाविद्यालयामध्ये प्रा. डॉ. किरण खंडारे यांनी तब्ब्ल 30 वर्ष अध्यापणाचे कार्य केले आहे.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात सतत तीन वेळा अभ्यासमंडळाचे सदस्यासह विविध समित्यामध्ये त्यांनी अविरत कार्य केले आहे. प्रा. डॉ. किरण खंडारे हे इंग्रजी विषयाचे अमरावती विद्यापीठात पीएच डीचे मार्गदर्शक सुद्धा राहलेले असून त्यांच्या मार्गदर्शनात एकूण पाच प्राध्यापकांनी पदवीप्राप्त केल्या आहेत. एवढ्यावरच न थांबता प्रा. किरण खंडारे यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सेमिनार परिषदामध्ये सहभाग नोंदवून 30 प्रकारचे लेख सादर केले आहेत. त्यांनी पदभार स्विकारल्याबद्दल त्यांचे सर्वत्र स्तरातून अभिनंदन होत असून त्यांनी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. हर्षवर्धनजी देशमुख, उपाध्यक्ष श्री.नरेशचंद्र ठाकरे, कोषाध्यक्ष श्री.दिलीपराव इंगोले, उपाध्यक्ष अँड.श्री गजाननराव पुंडकर, सदस्य श्री.केशवराव मेतकर, प्राचार्य श्री.केशवराव गावंडे, सदस्य यांचे आभार मानले.