पातूर येथील डॉ. एच. एन. सिन्हा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायक जायले ह्यांचा सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ संपन्न

आजी व माजी विद्यार्थ्यांकडून सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार
पातूर : दि ३१ मार्च शहरातील नामांकित डॉ.एच.एन.सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालय पातूर येथे प्राचार्य म्हणून नेहमी विद्यार्थ्यांना सातत्याने सहकार्य करणारे व सर्व विद्यार्थ्यांचे लाडके असणारे प्राचार्य डॉ. विनायक जायले ह्यांच्या सेवानिवृत्तीचा निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सत्कारमूर्ती प्राचार्य डॉ.व्ही.एन.जायले हे होते. तसेच कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन करून प्रतिमेचे पूजन व हारअर्पण करून रीतसर करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप इंगोले तर प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले अशोकसिंह रघुवंशी, सदस्य महाविद्यालय विकास समिती, प्रभारी प्राचार्य डॉ. किरण खंडारे, डॉ. कृष्णराव भुस्कुटे, सदस्य महा. विकास समिती, गुलाबराव पाटील, सदस्य महा.विकास समिती, कृषीभूषण दादाराव देशमुख, आजीवन सदस्य श्री. शिवाजी शिक्षण संस्था अमरावती इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
तसेच महाविद्यालयातील आजी व माजी विद्यार्थ्यांकडून सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून निरोप देण्यात आला.ह्यावेळी आकाश हिवराळे,सागर इंगळे,अविनाश पोहरे,अर्जुन गहिलोत, अजिंक्य निखाडे, सुरज जंजाळ,कुणाल किरतकार आदींसह उपस्थित होते.
सदर कार्यक्रम हा कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार सोशल डिस्टन्सचे पालन व मास्क वापरून घेण्यात आला. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची दखल घेऊन कार्यक्रमांची आखणी करण्यात आली.संपूर्ण कार्यक्रम सोशल डिस्टन्स,मास्क व सॅनिटायजर वापर करून घेण्यात आला.
समारोपीय कार्यक्रमाला लाभलेले सत्कारमूर्ती प्राचार्य डॉ. व्ही. एन. जायले होते तर अध्यक्ष म्हणून लाभलेले दिलीप इंगोले हे होते. प्रास्ताविक रोनील आहाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्यक्रमाच्या समन्वयीका डॉ. ममता इंगोले यांनी केले.तर आभार संजय खांदेल यांनी मानले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रभारी प्राचार्य, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.