ताज्या घडामोडी
देगलूरचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई दि.10 :- देगलूरचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने राज्याच्या विधिमंडळातील अभ्यासू लोकप्रतिनिधी, मराठवाड्यातील लोकप्रिय, संघर्षशील नेतृत्व, सर्वसामान्यांशी नाळ जोडलेला निकटचा सहकारी आज आपण गमावला आहे. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानं देगलूर तालुका आणि महाविकास आघाडीची मोठी हानी झाली आहे. अंतापूरकर कुटुंबीय आणि देगलूरवासियांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. दिवंगत रावसाहेब अंतापूरकर साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असेही श्री. पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.