कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिप्री खुर्द गावामध्ये कँम्प घेण्यात आला

शरद भेंडे ग्रामीण प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील पिप्री खुर्द येथे कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावा मध्ये लसीकरण कँम्प घेण्यात आला
या मुळे वयोवृद्ध महिला, पुरुषांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तर या वेळी कोविड 19 ची लस घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवीली होती.
या वेळी वय मर्यादा 45 च्या वर एकूण 100लोकांना लस देण्यात आली त्यावेळी खालील कर्मचारी डॉ शारदा भीरडे एम ओ पी एच सी मुंडगाव डॉक्टर इक्बाल सर श्रीमती डी अ जावरकर श्रीमती वैशाली नाथे भूषण बेलसरे श्रीमती मंगला खोडके श्रीमती करुणा भारसाकडे श्री एस के वानखेडे श्रीमती मेघा दाभाडे आशा स्वयंसेविका माया जवंजाळ ज्योती घोम श्रीमती इंदिरा अंभोरे, दत्ता भगत देशोन्नती वार्ताहर व
गावकरी मंडळी
ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.