पातूर येथील डॉ.एच. एन.सिन्हा महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रम संपन्न

‘समता पर्व’ अंतर्गत विविध कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन
अविनाश पोहरे / पातूर
पातूर : पातुर डॉ. एच.एन. सिन्हा महाविद्यालयांमध्ये समता पर्व निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समता पर्व दिनांक 10 ते 14 एप्रिल या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस.खंडारे यांच्या मार्गदर्शनात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि श्री.शिवाजी शिक्षण संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त ऑनलाईन व्यक्तिरेखा मनोगत स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, तसेच दिनांक 14 एप्रिल रोजी महाविद्यालयाचे यूट्यूब चैनल चे उद्घाटन करण्यात आले. ‘अमेय 2021’ या अंकाचे ऑनलाइन प्रकाशन सोहळा करण्यात आला. त्यानंतर डॉ. के. एस. खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून श्री.शिवाजी महाविद्यालय अकोला येथील मराठीचे सहयोगी प्राध्यापक संजय पोहरे हे होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. माहुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. ममता इंगोले यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर कविता सादर केली. त्यानंतर प्रा. डॉ. संजय पोहरे यांच्या व्याख्यानाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणानंतर समारोप करण्यात आला. उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. माहुरे यांनी मानले.
या समता पर्वाच्या यशस्वी करिता महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. समता पर्वा दरम्यान आयोजित ऑनलाईन स्पर्धा व व्याख्याना करिता प्रा. डॉ. व्ही. जी. वसू, प्रा.डॉ.रोनील आहाळे, डॉ.ममता इंगोले,डॉ. राहूल माहुरे प्रा.डॉ. गायकवाड, प्रा. डॉ. संजय खांदेल,प्रा. एकबोटे यांनी विशेष सहकार्य केले. या ऑनलाइन कार्यक्रमाला महाविद्यालयाचे चंदू अमानकर, चतरकर, गोतरकर, अशोक पांडे यांची उपस्थिती होती.