ताज्या घडामोडी
पातूरात घराघरात महात्मा फुले जयंती साजरी.!

अविनाश पोहरे / पातूर
बहुजन समाजाच्या -हासाचे कारण,केवळ पिढ्यान् पिढ्या असणारे ‘अज्ञान’हेच आहे.”हे ओळखून शिक्षणाची ‘ज्ञानगंगा’ बहुजन समाजाच्या घरोघरी पोहोचवण्या साठी,आयुष्य पणाला लावणारे समाजसुधारक मानवमुक्तीच्या लढ्यात योगदान देणारे महात्मा जोतीराव फुले या महामानवास पातूरातील नागरीकांनी घराघरात जयंती साजरी करुन विनम्र अभिवादन केले.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व शासनाने लाँकडाऊन बाबत घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करत बाहेर कोठेही गर्दी न करता पातूरकरांनी घरा-घरात क्रातीसुर्य महात्मा जोतीराव फुले जयंती साजरी करुन एक नवा आदर्श समाजा समोर निर्माण केला.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.