पातुर पोलीस स्टेशन मध्ये आगामी सण उत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक संपन्न

अविनाश पोहरे / पातूर
पातुर दि : 12 एप्रिल 2021 आगामी होणारे सण-उत्सव रमजान ईद व 14 एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच याच दिवशी सुरू होणारा रमजान हा पवित्र उत्सव असून योग्य पद्धतीने साजरा करण्यात यावा. याकरिता विचार विनिमय आणि नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून पातुर पोलीस स्टेशन मध्ये शांतता समितीची बैठक 12 एप्रिल रोजी सोमवारी सायंकाळी संपन्न झाली. यामध्ये पातुर चे ठाणेदार हरीश गवळी यांनी मार्गदर्शन करताना मिरवणुकीचे नियोजन
आणि परवानगीचे आदेश शासनाकडून कुठल्याच
प्रकारचे नसल्याने हे उत्सव अगदी साध्या पद्धतीने व शासनाचे नियमानुसार शासनाचे नियम पाळून कुठलीही गर्दी न करता सोशल डिस्टंसिंग चे पालन करून सॅनिटायझर आणि मास्क चा वापर करून घेण्यात यावी. महामानवाच्या विचारांची पुस्तके घरोघरी देऊन विद्यार्थ्यांना तसेच वाचकांना चांगले विचार आत्मसात करण्याकरीता किंवा वाचण्याकरीता देऊन हा उत्सव साध्या पद्धतीने घरोघरी साजरा करण्यात यावा. असे त्यांनी आवाहन केले यावेळी पत्रकार बांधव आणि पोलीस पाटील
यांच्याशी चर्चा करून विचारांची आदान प्रदान करण्यात आली या बैठकीला पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे,पोलीस कर्मचारी भवाने, तसेच सर्व समाजातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव ,पोलीस पाटील आणि शांतता समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती.