विशेष पथकाची ग्राम तळेगांव, ग्राम मनब्दा येथे वरली जुगारावर धाड

गोकुळ हिंगणकर
तेल्हारा तालुका प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यात आज दि:२०/०४/२०२१ विशेष पथक गुन्हे शोध कामी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून खात्री लायक बातमी मिळाली की ग्राम तळेगांव(डवला) व ग्राम मनब्दा येथे काही इसम वरली जुगारावर खायवाडी व लागवडी करीत आहे तेथे धाड टाकली असता काही इसम वरली जुगारावर खायवडी व लागवडी करताना मिळून आले आरोपी १) प्रकाश जनार्दन तायडे वय २७ रा निंबोळी २)संजय राजू सावळे वय २८ रा तळेगांव (डवला) ३) सुभाष साहेबराव भगेवार वय ३८ रा तळेगांव (डवला) ४)विजय रामदास जमेवार वय ३५ रा तळेगांव (डवला) त्यांच्या जवळून तीन मोबाईल किंमत २५००० व नगदी २५२० असा एकूण २७,५२० रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच ग्राम मनब्दा येथे काही इसम वरली जुगारावर खायवडी व लागवडी करताना मिळून आले आरोपी १) कैलाश भाऊराव आग्रे वय ३९ रा मनब्दा
२) अनंता नीलकंठ इंगळे वय २५ रा मनब्दा ३) निवास प्रकाश भिसे वय ३० रा मनब्दा नगदी १४०० रू दोन मोबाइल किंमत १७००० रू असा एकूण १८,४०० रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी विरुद्ध पो स्टे तेल्हारा येथे महाराष्ट्र जुगार बंदी कायदा अनवे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे सदर कारवाई मां पोलीस अधीक्षक जि श्रीधर साहेब मां अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत मॅडम यांचा मार्गदर्शना खाली विशेष पथक चे प्रभारी पोलिस अधिकारी विलास पाटील त्यांच्या पथकाने केली