लसीकरणाच्या योग्य नियोजनासाठी तहसीलदारांनी पुढाकार घ्यावा तेल्हारा न प तिल भाजपा नगरसेवकांचे निवेदन

गोकुळ हिंगणकर
तेल्हारा तालुका प्रतिनिधी
तेल्हारा नगर परिषदतील भाजप चे न प सदस्य गटनेता नरेश आप्पा गंभिरे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी कोरोना लसीकरणाचे नियोजन करण्यातबाबत च्या विषयातर्गत दि 3 मे रोजी तेल्हारा तहसीलदारांना एक विस्तृत निवेदन सादर केले आहे.
कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असुन 1 मे महाराष्ट्र दिनापासुन केंद्र सरकारने 18 वर्षावरिल नागरिकांना लसीकरण करुन घेण्याची आवाहन केलेले आहे. मात्र तेल्हारा येथिल तालुकास्तरीय शासकीय ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यात कोठेही लस उपलब्ध नाही. युवक मोठ्या प्रमाणावर लसीकरणसाठी भटकंती करीत आहेत. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव व लसीकरण केंद्रावरील भविष्यात होणारी गर्दी टाळण्यासाठी संबंधित डाँक्टरांसोबत नियोजन करण्यास्तव आपण पुढाकार घ्यावा. असा आग्रह निवेदनातुन करण्यात आले आहे. नागरिक तथा नगरसेवक म्हणून आम्ही याकामी सहकार्य करण्यास तयार आहोत. असेही निवेदनात नमुद आहे.लसीकरणसाठी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्याकरिता तसेच नागरिकांच्या आरोग्याचा विचार नियोजनाची सक्त आवश्यकता लक्षात घेता लसिंचा पुरवठा कमी पडणार नाही याबाबत काळजी घेवुन नियोजन करावे. अशी विंनती निवेदनातुन शेवटी करण्यात आली आहे. निवेदनावर न प गटनेता नरेश आप्पा गंभिरे, महिला व बालकल्याण सभापती सौ आरतीताई गायकवाड, बांधकाम सभापती मंगेश सोळंके, नगरसेवक सुनिल राठोड यांच्या सह्या आहेत.