ताज्या घडामोडी

ह. भ. प. विठ्ठल महाराज साबळे यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी गोकुळाताई यांचा मृत्यू

शरद भेंडे ग्रामीण प्रतिनिधि

अकोट वारकरी संप्रदाय मध्ये मृदुंगाचा राजा म्हणून ज्यांची ओळख होती असे ह.भ.प.श्री विठ्ठल महाराज साबळे त्यांच्या पाठोपाठ सौभाग्यवती गोकुळाताई साबळे यांचे दुःखद निधन झाले. विठ्ठल महाराज साबळे हे आपल्या मृदुंग वादाना करिता व किर्तन ,भागवत, विशेषता भाषण शैली करीता सुप्रसिद्ध होते. महाराजांनी अवघ्या तारुण्यामध्ये महा क्षेत्र आळंदी येथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेतले व परत आपल्या गावी आल्यानंतर गावागावात जाऊन वारकरी संप्रदायाचा प्रचार ,प्रसार करायला सुरुवात केली. आपल्या कारकिर्दीमध्ये महाराजांनी बरेच मृदंग ,वादक ,कीर्तनकार घडवले समर्थ सद्गुरु गजानन महाराजांची शांतीवन अमृत तीर्थ प्रगतीपथावर आणण्या करीता साबळे महाराज यांचा सिंहाचा वाटा आहे. महाराज विदर्भ वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे नुकतेच विश्व वारकरी सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष पद सुद्धा महाराजांना मिळाले होते. महाराजांनी वारकरी संप्रदाय हा राजकीय क्षेत्रातही मागे नसावा याकरिता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी घेऊन उभे राहीले होते आंदोलन, मोर्चा , अमरण उपोषण, सामाजिक, धार्मिक, कार्यक्रम कुठेही असला तरी महाराज सर्वांच्या समोर असायचे. कुणबी समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये साबळे महाराजांचे अग्रगंण्य स्थान होते. पण गेल्या काही दिवसापासून महाराजांना अस्वस्थ वाटत होते . महाराजांनी कोरोणा टेस्ट केली असता. कुटुंबातील सर्वच पॉझिटिव आले आणि साबळे महाराजांनी मला सांगितल्याप्रमाणे अकोला सरकारी दवाखान्यात बेड न मिळाल्या मुळे मुर्तीजापुर ला त्यांचे मित्र डॉक्टर नेमाडे यांच्या माध्यमातून महाराज व त्यांच्या सौभाग्यवती दवाखान्यामध्ये भरती झाले. आम्ही बरीच महाराज मंडळी महाराजांना हिम्मत देण्याकरता सतत फोन करत होतो पण महाराजांचे मानसिक मनोबल खचत गेले आणि दि २८ ला पहाटे पाच वाजता साबळे महाराजांना हृदयविकाराचा झटका आला व त्यांची प्राणज्योत मावळली लागोपाठ दुपारी अकरा वाजता सौ.गोकुळा ताई साबळे यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यांची प्राणज्योत मावळली साबळे कुटुंबावर हे फार मोठं दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांचा मुलगा ऋषी साबळे अकोला सरकारी दवाखाना मध्ये भरती आहे त्याचे आम्हाला सतत फोन चालू असून त्याची ही प्रकृती ठीक नाही प्रशासनाने त्या कुटुंबाला धीर देण्याकरता महाराजांच्या मुलाच्या कडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे वारकरी संप्रदायामध्ये कधीही न भरून निघणारी हानी झालेली आहे मी गणेश महाराज शेटे आमच्या विश्व वारकरी सेनेच्या वतीने व महाराष्ट्रातील सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीने ह भ प विठ्ठल महाराज साबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व प्रशासनाने महाराजांचा मुलगा ऋषी साबळे यांच्या प्रकृतीची दखल घ्यावी ही विनंती करतो

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: