पातूर येथे ग्रामपंचायत शिर्ला अंतर्गत विविध कामांचे भूमिपूजन संपन्न

अविनाश पोहरे / पातूर
पातूर ग्राम पंचायत शिर्ला अंतर्गत प्रभाग क्रमांक १ मधिल दुला प्लाॅट, सैदु प्लाॅट, येथिल जनतेला अनेक वर्षांपासून पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती, जनतेची पाण्यासाठी होत असलेली वनवन लक्षात घेऊन ग्राम पंचायत शिर्ला अंतर्गत ५ लक्ष रुपयांची पाईप लाईन योजनेचे भूमिपूजन करण्यात आले आहे. तसेच शनिवार पूरा जमदार प्लाॅट येथिल ५ लक्ष रुपयांचे नाली बांधकाम चे भूमिपूजन करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक २ मधील नाली बांधकाम व ढापे बांधकाम यांचे सुध्दा भूमिपूजन करण्यात आले आहे तसेच नानासाहेब नगर येथील दलीत वस्ती योजने अंतर्गत रोड बांधकाम ची पाहणी करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हिदायत खान रुमखान उर्फ ईद्दु पहेलवान, शिवसेना नेते अजय ढोणे, ग्राम पंचायत शिर्ला सचिव राहुल उंद्रे सरपंच अर्चनाताई शिंदे, उपसरपंच कल्पनाताई खरडे, ग्राम पंचायत सदस्य सै. इरफान सै. अय्युब उर्फ इब्बु भाई, सुनील गावंडे, निर्भय पोहरे, फिरोज खान, शहजाद खान, नंदु यनकर, मंगल डोंगरे, सागर कढोणे, हाजी सै. अय्युब, मुश्ताक राणा, अनिल निमकंडे, मो. महताब अ. रऊफ, इमरान शेख, मो. शाकीर भाई, निखील उपर्वट, मो. मुजम्मील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.