जेवण बनविण्याच्या कारणावरून एकाची हत्या

शरद भेंडे ग्रामीण प्रतिनिधि
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पिंपरी खुर्द शिवारात जेवण बनविण्याचे कारणावरून मध्यरात्री हत्याकांड घडल्याची घटना 2 मे रोजी उघडकीस आली या हत्याकांडानंतर पळालेल्या आरोपीला पकडण्यात ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांचा जनसंपर्क कामी आला काही तासातच आकोट ग्रामीण पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींना पकडून बेड्या ठोकल्या आहेत अकोट तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील गजानन नारायण बोदडे यांच्या शेतात संत्रा च्या झाडाचे खोड काढण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील गिरगोटी गावातील छबुलाल भुसुम प्रभू राजाराम धिकार व रतिराम राजाराम दारशिबे हे तीन आदिवासी मजूर आले होते या मजुरांनी दिवसभर काम करून रात्री दारू पेले त्यानंतर रात्री 12 वाजता नंतर स्वयंपाक कोणी करायचा या कारणावरून शेतातच वादावादी सुरू झाली यावेळी प्रभू राजाराम धिकार याने रतिराम ला मारहाण केल्याने तो पळून गेला त्यानंतर छबुलाल भूसुम याला प्रभू राजाराम धिकार याने कुऱ्हाडीने व लाकडी दांड्याने चांगलीच मारहाण केली त्यामुळे जखमी अवस्थेत असलेल्या छबुलाल भुसूम यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याने प्रभू अधिकार पळून गेला त्यानंतर सकाळी रतिराम हा शेतात घटनास्थळी आल्यानंतर त्याला छबिलाल शुकलाल भुसूम ची हत्या झाल्याचे दिसून आले हत्याकांडाची माहिती मजुर कंत्राटदार शारिफोद्दीन नशीरोद्दीन राहणार अकोट पोलीस पाटील मानकर. रतिराम. शेतमालक गजानन बोदळे व मजूर कंत्राटदार यांनी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले सविस्तर घटनेची माहिती घेताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेतील आरोपी प्रभू धिकार हा पळून गेला होता याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रभू धिकार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आरोपीला सोमठाणा येथून अटक केली पासून पुढील तपास सुरू आहे आशा ठोकल्या आरोपीला बेड्या मध्यरात्री हत्या कांडानंतर आरोपी हा घटनास्थळावरून जंगलाकडे प्रसार झाला असे लोकेशन पोलिसांना मिळाले त्यामुळे आरोपीला पकडणे पोलिसांना अवघड झाले होते परंतु आरोपीला पकडण्यात अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फंड यांचा जनसंपर्क कामी आला आरोपी चे वर्णन देत ठाणेदार व पोलीस पथकाने या भागातील जनतेला सतर्क केले दरम्यान आरोपी प्रभू शिकार हा सोमठाणा येथे कपडे बदलून आला होता पळून जाण्यासाठी नातेवाईकांचे मोटर सायकलची वाट बघत होता जनसंपर्क मधील एका व्यक्तीने ठाणेदार ज्ञानोबा फंड यांना माहिती देत आरोपी चा फोटो पाठवून पडताळणी केली असता परिसरातील आदिवासी युवकांनी व ग्रामीण पोलिसांनी सोमठाणा येथे घेराव घालून पळून जात असताना आरोपीला पकडले