पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घरा घरात साजरी करा.

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
31 ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती असते दरवर्षी ही जयंती मोठ्या थाटामाटात समाजबांधव साजरी करीत असतात परंतु गेल्या वर्षापासून अख्या विश्वावर कोरोना महामारीचे संकट आहे.म्हणून आपण कुठेही घरा बाहेर न पडता जयंती घरा घरात साजरी करा असे आव्हाहन धनगर समाज संघटना तालुका बाळापूर जिल्हा अकोला व धनगर युवकसंघटनेच्या पदाधिकारी यांनी केले आहे.राजमाता पुण्यश्लोक होळकर यांची 296 वी जयंती सध्या महाराष्ट्रात आणि देशात कोरोनामहामारीचा धोका खूप जास्त प्रमाणात पसरलेला आहे .पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती येत आहे त्यांचा इतिहास हा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे .पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनचरित्र प्रेरणादायी आहे त्यांनी जवळ जवळ माळवा प्रांतावर 29 वर्ष राज्य केलं आणि त्यांच्या राज्यकारभाराचा ठसा संपूर्ण देशभर होता .त्यांनी अनेक जनकल्यांनकारी कार्य केलेत.मंदिर, घाट,रस्ते,धर्मशाळा तर संपूर्ण देशभर बांधल्या अनेक अंधश्रद्धा असलेल्या परंपरांना प्रतिबंध घातला .त्यांच्या बुद्धिचातूर्याचे अनेक वेळ संघर्षातून होणारी हानी टाळली प्राणीमात्रांची व निसर्गाची विशेष काळजी घेतली.शेती,व्यापार, ईतर व्यवसायाची भरभराट केली.आज जो 7/12 चा कायदा हा पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या काळातच विकसित झाला होता.राजकारण , समाजकरण, अर्थकारण,इत्यादी क्षेत्रात मुत्सद्दीपने त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला व उच्च स्थान गाठले . संघर्षमयी जीवनाचा कसा सामना करावा हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रातून प्रेरणादायी ठरते म्हणूनच अशा महान विरांगणेचा इतिहास समाजापर्यंत पोहचला पाहिजे व त्यांनी केलेल्या कार्याच्या कृतज्ञता म्हणून त्यांची जयंती समाजबांधवांनी शासनाच्या नियमांचे पालन करून घरा घरात साजरी करा असे आवाहन धनगर समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष मनोज करणकार व कार्याध्यक्ष राजेश दिवनाले,महासचिव संतोष कात्रे,उपाध्यक्ष दिलीप गव्हाळे,रवी घोंगे,राम तीतुर,मघाजी साबे,दिनेश डांगे,शुभम तीतुर,विकी नागे,वैभव घोंगे यांनी केले आहे .