पातूर येथे कोव्हीड सेंटरचे ना.पालकमंत्री बच्चुभाऊ कडू यांचे हस्ते उद् घाटन

अविनाश पोहरे / पातूर
बाळापूर विधानसभेचे आमदार नितीन देशमुख यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांना कोरोणासारख्या महामारीत चांगली सुविधा मिळावी या हेतूने निसर्गरम्य असलेल्या पातुर बाळापुर महामार्गावर असलेल्या डॉक्टर वंदनाताई ढोणे आयुर्वेदिक महाविद्यालय येथे जवळपास पन्नास बेडचे सेंटर उघडण्यासाठी एक कोटीचा निधी अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना उपलब्ध करून दिला
त्यानुसार आज रोजी त्याचे काम पूर्ण झाले असून सोमवारी नामदार पालकमंत्री आमदार बच्चुभाऊ कडू यांनी बाळापुर विधानसभेचे आमदार नितीन बापू देशमुख तसेच परभणीचे आमदार डॉक्टर राहूल पाटील यांच्या उपस्थिती मध्ये आणि प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या सेंटरचे उद्घाटन करण्यात आले आहे
यावेळी पालकमंत्री आमदार बच्चुभाऊ कडू यांनी पातुर बाळापुर तेल्हारा अकोट मुर्तीजापुर या ठिकाणी शंभर ते दीडशे बेड जिल्ह्यामध्ये सुरू केले असल्याची माहिती दिली असून दहा दिवसांमध्ये ऑक्सिजनचे त्यांचे काम पूर्ण होणार आहे त्यामुळे या सेंटरवर ऑक्सिजनची कमतरता आपण भरून काढणार आहोत अशी माहितीही पालकमंत्री नामदार बच्चुभाऊ कडू यांनी यावेळी दिली असून पातुर येथील ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयाचे आमदार डॉ. राहूल पाटील यांनी कोव्हीड सेंटर करता जागा उपलब्ध करून दिली इमारत उपलब्ध करून दिली तसेच त्यांचे स्वतःचे कर्मचारी दिले म्हणून त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल डॉक्टर राहुल पाटील यांचे पालकमंत्री आमदार बच्चू कडू यांनी विशेष आभार व्यक्त केले.
यावेळी अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी सौरभ कटियार, उपविभागीय अधिकारी विश्वनाथ घुगे ,पातुर चे तहसीलदार दीपक बाजड, नगर परिषद मुख्याधिकारी सोनाली यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले ,पातुर तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय जाधव, पातूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. चिराग रेवाळे, डॉक्टर राजकुमार चव्हाण, पातुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनंत लव्हाळे, पातुर नगरपालिकेच्या अध्यक्ष प्रभाताई कोथळकर, पातुर पंचायत समितीच्या सभापती लक्ष्मी ताई डाखोरे, शिवसेनेचे शहर प्रमुख अजय ढोणे, प्रहार सेवक शुभम उगले,अमोल करवते,जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती रामसिंग जाधव, पातुर नगर परिषदेचे गटनेते हाजी सय्यद बुरहान ठेकेदार, पातुर चे नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते हिदायत खान , आदी मान्यवर उपस्थित होते.