राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 296 वी जयंती मनारखेड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
31 मे म्हणजे राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती दरवर्षी प्रत्येक गावा मध्ये ही जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येते परंतु गेल्या दोन वर्षांपासून अख्या विश्वावर कोरोना महामारीने थैमान घातले आहे. व संपूर्ण विश्व डबघाईस आलेले आहे .अश्या महामारीमुळे या वर्षी ही जयंती कुठल्याही प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम न घेता फक्त हार अर्पणाच्या नियोजनावर पार पडली दरवर्षी मनारखेड येथे काही काही सांस्कृतिक कार्यक्रम,आरोग्य शिबिर आयोजित करून ही जयंती साजरी केली जाते .या वर्षी शाशनाने दिलेल्या नियमावलीनुसार साजरी करण्यात आली.सर्वप्रथम उपसरपंच गोपाल दिवनाले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर धनगर समाजातील प्रतिष्ठित नागरिक भानुदास नागे यांनी हार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर नागोराव सुशीर,वसंता नागे,गजानन दिवनाले,महादेव दिवनाले,गजानन वरुडकर,दादाराव इंगळे,राजेश लोड,मनोहर वसतकार,नागेश नागे,सचिन दिवनाले,राजेश दिवनाले,अमोल नागे ,अक्षय नागे,मुकुल दिवनाले, ऋषी बिलेवार, बंटी शेळके,यश दिवनाले,प्रेम दिवनाले,प्रणव दिवनाले,आर्यन नागे,भावेश सुषिर यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना हार अर्पण करून अभिवादन केले यावेळी समस्त गावकरी मंडळी मनारखेड उपस्थित होते.