ताज्या घडामोडी
बाळापुर मधील कासारखेड परिसरात RTPCR TEST कॅम्पचे आयोजन

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
बाळापुर शहरांमधील कासारखेड परिसरात कोरोना या रोगाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन, ग्रामस्थांच्या मागणीवरून शहर प्रशासन यांनी नगर परिषद शाळा क्रमांक 3 मध्ये RTPCR TEST चे आयोजन केले असता, नगरपरिषद बाळापूरचे मुख्याधिकारी गोपीचंद पवार,नगर परिषद उपाध्यक्ष राहूल तायडे, नगर परिषद कर्मचारी व पत्रकार दाभाडे पत्रकार नितीन हुसे या सर्वांनी स्वतः कासारखेड विभागात घरोघरी जागून लोकांना टेस्ट करण्याचे आव्हान केले असता.या विभागातील एकूण 85 ग्रामस्थांनी टेस्ट करून घेतली.त्याप्रसंगी ग्रामीण रुग्णालय, बाळापुर यांच्या टीमने डॉ.चेतन टिकार यांच्या मार्गदर्शनाखाली ही चाचणी संपन्न झाली या करिता योगेश धनोकार यांचे विशेष सहकार्य लाभले.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.