आमदार नितीन देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त बाळापुर शहरात रक्तदान शिबिर संपन्न.

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
बाळापुर शहरात आमदार नितीनबाप्पू देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त, महाराष्ट्रात कोरोना काळात आलेला रक्त टंचाई चा साठा भरून काढण्यासाठी, शहरातील एकूण 47 युवकांनी बाळापूर येथील जयसस्तंभ चौकातील सभागृहात रक्तदान केले. त्याप्रसंगी या रक्तदान शिबिरात स्वतः आमदार नितीन देशमुख यांनी भेट दिली असता त्याप्रसंगी शिवसेनेचे सुभाषचंद्र धनोकार, उमेशआप्पा भुसारी, करणसिंग ठाकूर, आनंद बनचरे,श्याम बहुरूपे,दिल्लु ठाकुर,जितेंद्र अहीर, निर्भय ठाकूर,शेखर ठाकूर, धरमसिंग ठाकूर गणेश भिसे, शुभम जोध, गोपाल ठाकूर, राहुल अहिर, योगेश ठाकूर, शुभम सोनोने, देवर्षी देशमुख,गजानन जामोदे इत्यादी शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.बाळापुर शहरांमध्ये आमदार नितीन बाप्पू देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात आलेला रक्तटंचाईचा साठा भरून काढण्यासाठी रक्तदान करणाऱ्या 47 युवकांचे शहर शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख आनंद बनचरे यांनी आभार मानले.