बाळापूर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आशा सेविकांचा साळी चोळी देऊन सत्कार

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
31 मे 2021 रोजी मा.प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचे कार्यकाळाला 7 वर्ष पुर्ण झाले असून खासदार मा.ना.संजयभाऊ धोत्रे यांचे केंद्रीय मंत्री पदाच्या कार्यकाळाला आज 2 वर्ष पुर्ण होत असल्यामुळे केंद्रीय मंत्री संजयभाऊ धोत्रे यांच्या आवाहनानुसार भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आ.रणधिरभाऊ सावरकर प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजरावभाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने बाळापूर शहर येथील आशा सेविका कोरोना काळात आपल्या व आपल्या परिवाराच्या जीवाची काळजी न करता सामोरे जाऊन जनतेला सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांचा साळी चोळी देऊन सत्कार करणात आला या कार्यक्रमासाठी महेंद्र सिंह पेजवार भाजपा शहर अध्यक्ष, यूवा अध्यक्ष योगेशदायमा,सरचिटणीस दिनेश सोनोने,दिपक हिरळकर,जितेश अहिर,मनोज बनचरे, वैध्यकीय सेल अध्यक्ष डॉ.रूपेश शाह, डॉ.मनिष शाह,प्रभावतीबाई कारंजकर,संदिप शाह,मुस्ताक खान व आजी माजी पदाधिकारी हजर होते