व्याळा येथे घरकुल मार्टचे शुभारंभ..!

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी
आज दिनांक 15 जून 2021मंगळवार रोजी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अकोला अंतर्गत बाळापूर तालुक्यामधील व्याळा येथे प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, अकोला मा.श्री. सुरज गोहड सर आणि जिल्हा अभियान व्यवस्थापक मा.श्री. गजानन महल्ले सर यांच्या मार्गदर्शनखाली वसुंधरा ग्रामसंघ व्याला आणि समर्थ ग्रामसंघ व्याला यांच्या माध्यमातून आवास योजनेतून घर बांधकाम साठी लागणारे साहित्य विक्रीसाठी महिलांनी 2 घरकुल मार्ट चे उदघाटन जिल्हा परिषद सदस्या मा. वर्षाताई वझीरे आणि गट विकास अधिकारी, पंचायत समिती, बाळापूर मा. श्री. अक्षय सूक्रे सर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळेस बाळापूर तालुका अभियान व्यवस्थापक श्री. घनश्याम धनोकार, प्रभाग समनव्यक व्याळा प्रभाग श्री. गोपाल भाकरे, प्रभाग समनव्यक देगाव प्रभाग श्रीमती भावनाताई चिंचोळकर, पंचायत समिती, बाळापूर येथील श्री. काळे सर कक्ष अधिकारी, श्री. साखरकर सर लेखाधिकारी, श्री. नाकट सर विस्तार अधिकारी कृषी, श्री. डी. एस. अंभोरे ग्रामसेवक तसेच व्याला येथील ग्रामसंघ पदाधिकारी तसेच गावातील सर्व प्रेरीका आणि समूहातील महिला मोठया संख्येने हजर होत्या.