ताज्या घडामोडी

रोडच्या कामाच्या ट्रकाच्या धुळीने मालेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतातील तुरीचे पिकाचे नुकसाना

अजय चोथमल प्रतीनीधी मेडशी दि. 22. मालेगाव येथील व परीसरात सध्या सगळीकडे रसत्याची कामे सूर आहेत त्याकरिता टेकडी खोदून मुरूम नेण्याचे काम आहे मात्र सध्या शेतात तुरी असल्याने दिवसाच्या जवळपास एक हजार हजार चकरामुळे रस्त्यावरील धूळ तुरीच्या फुलांवर जात आहे त्यामुळे शेतातील तुरीचे नुकसान होत असून त्या भागातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत . याकडे तहसीलदार रवी काळे यांनी लक्ष देण्याची मागणी केल्या जात आहे.
सदा सर्वकाळ शेतकरी संकटात सापडला आहे. कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट शेतकऱ्यावर येत असते त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने शेती ही ही बिन भरवशाची झाली आहे तरीही शेतकरी आशा म्हणून आपली शेती व्यवस्थित करण्याकडे लक्ष देत असतो सध्या शेतकऱ्यांच्या शेतात हरभऱ्याचे पीक वर आलेले आहे तर काही शेतात तूरी सध्या चांगल्या अवस्थेत आहेत लोक पाणी देऊन पिके वाचवत आहेत सध्या काही ठिकाणी फुले आहेत तर काही ठिकाणी शेंगा आहेत अस्मानी संकट पाहता सध्या ढगाळ वातावरणाने शेतकरी त्रस्त आहेत तुरीला पाणी देऊन तुरीला वाचवत आहे आहे मात्र त्यासोबतच सुलतानी संकट सुद्धा आलेले आहे खिर्डा शिवारात काशिनाथ बाबा टेकडीच्या मागे काही शेतकऱ्यांनी मुरमा करता टेकड्या कंपनीला विकल्या त्या कंपनीच्या माध्यमातून दररोज एक हजार ट्रिप मोठ्या लोडिंग ट्रक च्या सहाय्याने गौण खनिज नेल्या जात आहे मात्र नेता नेता मध्यंतरी ज्या शेतकऱ्यांच्या शेती आहेत त्या शेतकऱ्यांच्या शेतात धुळीमुळे फुले गळून पडतात शेंगा खाली पडत आहेत आहेत याकडे तहसीलदारांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली जात आहे.
स्मबंधीत कंपनी आणि ट्रक मालक यांना शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी सांगण्यात येईल आणि तूर येई पर्यंत तो रस्ता बंद ठेवण्यासाठी सांगण्यात येईल

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: