ताज्या घडामोडी

पातूर शहरातील अतिशय गरीब कुटुंबातील मुलीने आई-वडिलांचे स्वप्न साकारले.

पातूर कन्या पल्लवी गोतरकार नीट परीक्षा देऊन शासकिय कोट्यातून एम.बी.बी.एस.ला प्रवेश

प्रविण पोहरे – कार्यकारी संपादक

पातुर :- पातूर येथील खाटीक समाजातील कुटुंब हे अत्यंत गरीब हात मजुरी करणारे पल्लवी चे वडील पांडुरंग गोतरकार यांनी अतिशय बिकट परिस्थितीमध्ये त्यांच्या मुलीला डॉक्टर बनण्याकरिता स्वत:ला झिजवून आपल्या मुलांचे उंच भरारी घेण्याचे स्वप्न आज साकारले आहेत. पांडुरंग गोतरकार हे पातूर शहरांमध्ये मटणाचा व्यवसाय करतात त्यांना दोन मुली एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या मुलाचे स्वप्न सुद्धा एमबीबीएसला शासकीय कोट्यातून लाभ मिळविण्यासाठी प्रयत्न केले परंतु पैशाचा अभावी जिल्हा ठिकाणी शिकवणी न घेता आल्याने त्याला काही गुण कमी पडल्याने बी.ए.एम.एस. ला जावे लागले. अशी मुले गावासाठी ,समाजासाठी व इतर युवकांसाठी प्रेरणादायी ठरतात.अशा गरीब कुटुंबातील कर्तुत्ववान मुलांच्या यशाला पाहून पातुर येथील सामाजिक कार्यकर्ते ठाकूर शिवकुमार सिंह बायस व इतर सामाजिक कार्यकर्ते गणेश गाडगे, रितेश सौंदडे गुरुजी, योगेश फुलारी, पत्रकार किरण कुमार निमकंडे यांनी मिठाई , बुके व शाल देऊन मुलांच्या सोबत आई-वडिलांचा यथोचित सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: