आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांची पंचायतराज समितीच्या प्रमुख पदी निवड

नयन खरात
तालुका प्रतिनिधी मेहकर
मेहकर- लोणार मतदार संघाचे आमदार डॉ. संजयजी रायमुलकर यांची पंचायतराज समितीच्या प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल शिवशक्ती ट्रॅक्टर्स मेहकर व शिवशक्ती बहुउद्देशीय संस्था मेहकर च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमात शिवशक्ती ट्रॅक्टर्स चे संचालक किशोर गारोळे, युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव, माजी नगरसेवक भाष्करराव गारोळे, सुधाकरराव गारोळे, शोभा सार्वजनिक वाचनालय बोरी चे अध्यक्ष दशरथ चनखोरे, शिवनेरी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजेश गारोळे, महात्मा फुले व्यायामशाळा अंजनी बु।। चे अध्यक्ष गजानन पायघन, संदीप गारोळे, आशिष गारोळे, स्वप्नील गारोळे, सुरेश काळे, जनार्धन काळे, राजू आव्हाळे, कैलास नवले, शंकर काळे, ऋषिकेश काकडे, शुभम चनखोरे तसेच संस्थेचे पदाधिकारी व कार्यकार्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.